सुस्वागतम!

राज्य मराठी विकास संस्थेचे स्वरूप आणि कार्य यांसंबंधीची माहिती सर्व जिज्ञासूंपर्यंत पोचविणाऱ्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत!

विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते.
सूचना:
मराठी भाषा समाजाच्या तळापर्यंत रुजून सुदृढ व्हावी आणि सर्वांगाने बहरावी यासाठी आपले विचार, मते, सूचना आम्हाला जरूर कळवा. आपल्यातील सुसंवादातून मराठीच्या विकासाला गती मिळेल.
राज्य मराठी विकास संस्थेच्या विविध प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच विभागीय समन्वयक पदांसाठीची निवड यादी
लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धा
लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांच्या जन्मदिनाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. १९६१ ते १९९३ एवढा प्रदीर्घ काळ त्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष होत्या, अध्यक्ष असताना तब्बल ३२ वर्ष त्यांनी लोकसाहित्याचे संकलन-संपादन केले. लोकसाहित्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी त्या एक होत. त्यांच्या याच स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभरात ‘लोकसाहित्य सादरीकरण’ अशा स्वरूपाची शालेय आणि खुल्या स्तरावरील स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील अर्ज भरून पाठविणे बंधनकारक आहे.
गुगल अर्ज | नियम व अटी
म्हणींच्या कथांवरून चित्रकला स्पर्धा
राज्य मराठी विकास संस्था नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. मराठीतील निवडक म्हणींचा वापर करून स्पर्धकांना एक कथा लिहावयाची होती. राज्यभरातून या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याचाच पुढील भाग म्हणून राज्यभरातील लेखकांनी म्हणींवरून लिहिलेल्या कथांवरुन चित्र काढणे या स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. स्पर्धकांनी आपले अर्ज व काढलेली चित्रे दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत chitra.rmvs@gmail.com या ई-पत्त्यावर पाठवावी. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील अर्ज भरून पाठविणे बंधनकारक आहे.
गुगल अर्ज | बक्षीसांचे स्वरूप चित्रांसाठीच्या कथा पुढीलप्रमाणे आहेत. यातील कुठल्याही कथेवरून आपण चित्र काढू शकता:
राज्य मराठी विकास संस्थेच्या महाराष्ट्रातील मराठी भाषा व मराठी साहित्य या संदर्भात संशोधन करणाऱ्या मान्यताप्राप्त मंडळ /संस्थांसाठी अर्थसहाय्य योजना
राज्य मराठी विकास संस्थेच्या महाराष्ट्रातील मराठी भाषा व मराठी साहित्य या संदर्भात संशोधन करणाऱ्या मान्यताप्राप्त मंडळ /संस्थांसाठी अर्थसहाय्य योजना यासंदर्भातील PDF जाहिरात सोबत जोडली आहे.
यासंदर्भातील google अर्ज सोबत येथे जोडला आहे.

जाहिरात आणि आवाहने

horizontal divider

संस्थेची प्रकाशने


पार्थ घोष व इतर
मूल्य १५५

वासुदेव बळवंत पटवर्धन
मूल्य- ३७६

गीता भागवत
मूल्य २७५ रुपये

लीला पाटील
मूल्य - १५०

डॉ. वसंत जोशी
मूल्य २७५ रुपये

गीता भागवत
मूल्य २७५ रुपये

डॉ. भीमाशंकर देशपांडे
मूल्य - १५०
प्रकाशनांची संपूर्ण सूची
horizontal divider
horizontal divider