उपक्रम

१९९३ ते २०१३ मधील उपक्रम

कार्यशाळा
१. प्रशासनात मराठीचा गुणवत्तापूर्ण वापर व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सहा महिने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन. (मुंबई - १९९४)
२. इंग्रजी माध्यमातील शाळांमधून मराठीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन (मुंबई - २ सप्टेंबर १९९४)
३. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिक्षकेतर (प्रशासकीय) कर्मचाऱ्यांना प्रशासनिक लेखनासंबंधात मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा(कोल्हापूर - दि.१४ ते १६ ऑक्टोबर १९९७)
४. `लोकवैद्यक' या प्रकल्पाखाली वैद्यक व्यवसायींना मराठीतून कामकाज करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी पुढीलप्रमाणे विविध कार्यशाळांचे आयोजन:
  • `जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांसाठी (डेमो) कार्यशाळा. 'औंध उरो रुग्णालय यांच्या सहकार्याने. (पुणे - दि. ८ ते १० ऑक्टोबर १९९७)
  • रेडिओवर सादर करावयाच्या वैद्यकीय कार्यक्रमांचे लेखन कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा (मुंबई - दि. १५ नोव्हेबर१९९७)
  • ‘परिचारिकांसाठी कार्यशाळा’ औंध उरो रुग्णालय यांच्या सहकार्याने (पुणे - दि. २२ ते २४ डिसेंबर१९९८)
  • ‘वैद्यकीय पत्रकारिता कार्यशाळा’ पत्रकारिता विभाग, पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने(पुणे - दि. ३ जानेवारी १९९८)
  • ‘वैद्यकीय पत्रकारिता कार्यशाळा’ मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने (मुंबई - दि.१४ मार्च १९९८)
  • ‘वैद्यकीय पत्रकारिता कार्यशाळा’ मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने. (मुंबई - दि. २२ फेब्रुवारी १९९९)
५. ‘प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य कृतिसत्र’ सृजन आनंद शिक्षण केंद्र, कोल्हापूर यांच्या सहकार्याने (कोल्हापूर - दि. ५ फेब्रुवारी २००६)
६. ‘शिकवण्यासाठी शिकूया’ (प्राथमिक शिक्षकांसाठी २ दिवसांची कार्यशाळा) अक्षरनंदन, पुणे यांच्या सहकार्याने (पुणे - २० व २१ जानेवारी २००७)
७. ‘शुद्धलेखन कार्यशाळा’ शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शक श्री. अरुण फडके यांची कार्यशाळा. (२५ फेब्रुवारी २०१२)

चर्चासत्रे
१ ‘प्राथमिक- माध्यमिक शाळांतील मराठीचे शिक्षण’ (मुंबई - दि. १८ एप्रिल १९९४)
२ ‘पहिली ते बारावी इयत्तांची मराठी पाठ्यपुस्तके’ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व बालभारती यांच्या सहकार्याने (पुणे - दि. ३ व ४ मे १९९४)
३ ‘स्वातंत्र्योत्तर काळातील कन्नड व मराठी  साहित्य - तौलनिक परामर्श’ मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा यांच्या सहकार्याने (गुलबर्गा - मार्च १९९५)
४ ‘कै.त्र्यंबक शंकर शेजवलकर' यांच्या इतिहासक्षेत्रातील कार्याचे समालोचन’ याचवेळी संस्थेच्या शेजवलकर विषयक दोन पुस्तकांचे प्रकाशन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने. (पुणे - दि.२२ व २३ जुलै १९९५)
५ ‘विधी व न्यायव्यवहारात मराठीचा वापर’ विधिविभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सहकार्याने.(मुंबई - दि. २३ व २४ डिसेंबर १९९६)
६ ‘तेलुगु व मराठी साहित्य यांच्यातील अनुबंध’ तेलुगु विद्यापीठ, हैदराबाद  आणि तेलुगु भाषा अभिवृद्धि संघम् सोलापूर यांच्या सहकार्याने. (सोलापूर -१२ व १३ मार्च १९९६ )
७ ‘मराठीतील कोशवाङ्मय : वस्तुस्थिती आणि अपेक्षा’स. गं. मालशे संशोधन केंद्र, एस.एन्. डी.टी. महिला विद्यापीठ व मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने. (मुंबई - दि.८ व २१ सप्टेंबर १९९६)
८. ‘वैद्यकीय व्यवहारात मराठीचा वापर’ इंडियन मोडिकल असोसिएशन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सहकार्याने. (मुंबई )
१० उच्च माध्यमिक मराठीच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करण्यासाठी संबंधित शिक्षकांचे चर्चासत्र. वझे महाविद्यालय, मुलुंड यांच्या सहकार्याने. (मुंबई - १ एप्रिल २००१)
११ ‘भाषांतरकारांचे संमेलन' कलासक्त व सृष्टी सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, पुणे यांच्या सहकार्याने. (पुणे -  दि. १ मे २००३)
१२ ‘मराठीतील विज्ञानसाहित्य’तत्त्वज्ञान विभाग,पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने. (पुणे - दि. २७ व २८ फेब्रुवारी २००४)
१३ ‘भाषांतर : स्वरूप आणि प्रक्रिया’ एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने. (पुणे - दि. १३ व १४ डिसेंबर २००४)
१४ ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमधील मराठी विषयाची दुरवस्था : कारणे आणि उपाय’ मराठी विभाग, पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने.(पुणे - दि. १४ व १५ ऑक्टोबर २००५)
१५ ‘आंतरराष्ट्रीय शांततावर्षात उफाळलेली हिंसा’ (व्याख्याने आणि चर्चा)समाजमानस यांच्या सहकार्याने.(कोल्हापूर - १० डिसेंबर २००७)
१६ ‘मराठी प्रमाण भाषेचे लेखन : एक नवविचार’ मॉडर्न महाविद्यालय, पुणे यांच्या सहकार्याने. (पुणे - २० व २१ फेब्रुवारी २००८)
१७ ‘अध्यापन एक आनंदयात्रा’शिक्षणमंडळ, गोरेगाव यांच्या सहकार्याने. (मुंबई - २००८)
१८ ‘महाराष्ट्रातील (विशेषतः मराठवाड्यातील) मराठी साहित्य’ मराठी साहित्य परिषद, हैदराबाद यांच्या सहकार्याने. (हैदराबाद - २९ व ३० मार्च २००८)
१९ ‘भाषाविज्ञान संशोधन पद्धती’ मराठी विभाग पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने. (पुणे - २९ व ३० डिसेंबर २००८)
२० ‘शताब्दी स्मरण चर्चासत्र’ (बा. सी. मर्ढेकर, पु. शि. रेगे, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर यांच्या कवितेच्या संदर्भात) मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने. (मुंबई - ११ व १२ जानेवारी २०१०)
२१ ‘क्रमिक पुस्तकांतील मराठी आणि मराठीचे अभ्यासक्रम’ मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद यांच्या सहकार्याने. (औरंगाबाद दि. २९ ऑक्टोबर २०१२ ते २ नोव्हेंबर २०१२).

शासनास कार्यवाहीसाठी सादर केलेले अहवाल
१ प्रशासकीय कामकाजातील मराठी भाषेच्या वापरासंबंधी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञसमितीचा अहवाल.( दि. १० मार्च १९९५)
२ ‘विधी व न्यायव्यवहारात मराठीचा वापर’ या चर्चासत्रातून मिळालेल्या निष्कर्षांचा अहवाल. ( दि. १७ जानेवारी १९९६)
३ ‘वैद्यकीय व्यवहारात मराठीचा वापर’ या चर्चासत्राचा अहवाल. ( दि. ११ फेब्रुवारी १९९७)
४ ‘संगणकासाठी एकरूप प्रमाणित लिपी व वर्णमाला’. (दि. ११ मार्च २००२) या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी वर्णमाला आणि वर्णलिपिविषयक शासननिर्णय (शासन निर्णय, क्रमांक – मभावा-२००४/(प्र.क्र./२५/२००४)/२० ब दिनांक ६ नोव्हेंबर २००९) प्रसृत केला.

सर्वेक्षणे
१ ‘अमराठी शाळांतील मराठीचे अध्यापन' या विषयावर मुंबईतील शाळांमधून सर्वेक्षण. (एप्रिल १९९४)
२ ‘महाराष्ट्राचा भाषिक नकाशा’ तयार करण्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातील काही शहरे व गावे निवडून केलेले एक चाचणी सर्वेक्षण. (जून १९९५)
३ महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील महामंडळे व प्राधिकरणे यांतील मराठीच्या वापरासंबंधी केलेले एक सर्वेक्षण. (१९९६)
४ मराठीच्या संदर्भातील प्रश्नांचा विचार करून एक प्रश्नावली संस्थेने तयार केली. त्या आधारे मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आळंदी येथे सर्वेक्षण. (फेब्रुवारी १९९६)